आणखी दहा आमदार फुटणार ?
आणखी 10 आमदार महायुतीत येण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते. हे आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी सांगितले नाही. तर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल विरोधात गेल्यास भाजपजवळ बी प्लान तयार आहे का ? अशी त्यांना विचारणा केली असता, त्याची गरज पडणार नाही, राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील, असेही बावनकुळे म्हणाले.