March 1, 2024
PC News24
कलाशाळा/महाविद्यालय/शैक्षणिकसामाजिक

“भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय”- राज्यातील पहिल्या संगीत विद्यालयाचे उद्या भूमिपूजन.

“भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय”- राज्यातील पहिल्या संगीत विद्यालयाचे उद्या भूमिपूजन.

मंगेशकर कुटुंबाची खास उपस्थिती

भारतीयांच्या मनामनात आपल्या अवीट गाण्यांचा ठसा उमटविणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची २८ सप्टेंबरला जयंती आहे. त्याचे औचित्य साधत लतादीदींच्या नावे राज्यातल्या पहिल्या संगीत विद्यालयाचे भूमिपूजन होणार आहे.,उद्या बुधवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.महापालिकेकडून या संगीत विद्यालयाच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडून स्व. लता मंगेशकर यांच्या नावे हे राज्यातील पहिले संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारले जाणार आहे.यावेळी
मंगेशकर कुटुंबाची विशेष उपस्थिती राहणार आहे.

स्व. लता मंगेशकर यांच्या नावे संगीत विद्यालय उभारण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या वर्षी राज्य सरकारकडे केली होती.मिरा-भाईंदरमध्ये नवीन संगीतकार तयार व्हावेत, व त्यांना संगीत क्षेत्रातील उत्तम प्रशिक्षण मिळावे, यासाठी मिरा रोडच्या रामदेव पार्क येथील आरक्षण क्र.२४६ ही जागादेखील सुचवण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने ‘मूलभूत सोयीसुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत संगीत विद्यालय उभारण्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पालिकेने नुकतीच पूर्ण केली आहे.

उद्या बुधवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता महापालिकेकडून संगीत विद्यालयाच्या भूमिपूजना नंतर स्व. लता मंगेशकर नाट्यगृहात एका संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरचे संगीत विद्यालय प्रत्यक्षात आले की, ते राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न केले जाणार आहे. त्यामुळे संगीत क्षेत्रात अभ्यास करणाऱ्यांना येथे पदवी घेता येईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

Related posts

पिंपरी चिंचवड : मोशी येथील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई.

pcnews24

तळेगाव:जनरल मोटर्स कंपनी बंद विरोधात तळेगाव ते मंत्रालय पायी धडक मोर्चा.

pcnews24

स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश,खडकवासला दुर्दैवी घटना

pcnews24

प्रदुषणाने फेसाळली पवना नदी- महापालिकेचे नदीकडे दुर्लक्ष, मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे काम तातडीने होणे अत्यावश्यक- अमोल देशपांडे.

pcnews24

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘विना वाहन वापर’ धोरणास देशात प्रथम क्रमांक.

pcnews24

कलाकृती साकारताना अध्यात्मिकतेबरोबरच चिंतनशील मनाची एकाग्रता गरजेची :श्री. वासुदेव कामत.

pcnews24

Leave a Comment