November 29, 2023
PC News24
अपघातठळक बातम्याराजकारणराज्य

साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या मांडवाला आग;जे पी नड्डा आरतीसाठी आले होते

साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या मांडवाला आग;जे पी नड्डा आरतीसाठी आले होते.

पुण्यातील आंबीलोढा कॉलनी नजीक साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आले असताना मंडळाच्या मांडवात आग लागल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. आग लागली त्याच दरम्यान जोराचा पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली व मोठी दुर्घटना टळली व जखमी वा जिवितहानी झाली नाही.

गणेशोत्सव मंडळाने देखावा म्हणून महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आज (26 सप्टेंबर ) ला या मंडळाच्या गणपतीची रात्रीची आरती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते चालू असताना त्याच मंदिराच्या कळसाला आग लागली. त्यामुळे जे पी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. आग लागली त्याच दरम्यान जोराचा पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली व मोठी दुर्घटना टळली. तसेच अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आहे.आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

Related posts

छत्रपती संभाजीनगर रात्री ११ नंतर बंद!!

pcnews24

कर्नाटक, बागलकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनानं हटवल्यामुळे तणाव.

pcnews24

प्रतिष्ठित शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रस्तावांचा छाननी तक्ता प्रकाशित

pcnews24

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

pcnews24

२००० रूपये नोटे संदर्भातले आरबीआय तर्फे विविध पर्याय

pcnews24

चिंचवड विभागात नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी : भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

pcnews24

Leave a Comment