मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; इंटरनेट बंद तर शाळांना सुट्टी.
मणिपूरमधील इंफाळमध्ये आज सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका शिक्षकासह 54 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जुलै महिन्यापासून बेपत्ता झालेल्या 2 विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात हे सर्वजण आंदोलन करत होते. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून राज्य सरकारने पुढील 5 दिवस मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. तसेच 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत सर्व शासकीय व निमसरकारी शाळा बंद ठेवण्यास सांगितले.