आज गुगलचा 25 वा वाढदिवस,डुडल द्वारे होतंय सेलिब्रेशन- PCnews तर्फे Google ला शुभेच्छा!
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलचा आज 25 वा वाढदिवस आहे. आज म्हणजे 27 सप्टेंबर 2023 रोजी गुगल 25 वर्षाचे झाले आहे. त्याचे सेलेब्रेशन गुगलनेही डुडल द्वारे साजरे केले आहे.
सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज हे दोघे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्सची पदवी घेत होते. इंटरनेट – म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब बाबत दोघांचंही व्हिजन सारखंच असल्यामुळे त्यांनी एकत्र एक सर्च इंजिन तयार करण्यास सुरुवात केली.
27 सप्टेंबर 1998 साली गुगल इनकॉर्पोरेटेडची अधिकृत स्थापना करण्यात आली. पेज यांनी सुरुवातीला या कंपनीचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते बदलून ‘गुगल’ करण्यात आलं.
गुगल हा शब्द खरंतर ‘Googol’ या शब्दाचं बदललेलं रुप आहे. एकावर शंभर शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते, तिला गुगोल म्हणतात. यापासूनच गुगलचं नाव देण्यात आले आहे.असे हे गुगल आज 25 वर्षाचे झाल. जे आपल्या वाढदिवसा देखील न विसरता शुभेच्छा देते. अशा या गुगल PCNews24 कडून (Google) हार्दिक शुभेच्छा !