November 29, 2023
PC News24
जीवनशैलीतंत्रज्ञानदेशपिंपरी चिंचवडमहानगरपालिका

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे स्मार्ट सारथी अॅप देशात दुसरे तर राज्यात प्रथम-इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड – ‘गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मान

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे स्मार्ट सारथी अॅप देशात दुसरे तर राज्यात प्रथम-इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड – ‘गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मान.

पिंपरी – भारत सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये ‘गव्हर्नन्स’ श्रेणीत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी अॅपने देशात दुसरे स्थान पटकाविले.

इंदौर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या या कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना सन्मान चिन्ह व पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

इंदौर (मध्यप्रदेश) येथे आज ( बुधवारी) इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड कार्यक्रमात राज्यपाल मंगुभाई पटेल, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्यासह विविध स्मार्ट सिटीचे सीईओ आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभरातील 80 पात्रताधारक शहरांमधून पिंपरी-चिंचवडला “गव्हर्नन्स” पुरस्कार प्राप्त झाला आहे. पिंपरी-चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश संपादन केले.पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी ही एक अभिमानाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात भर घातली आहे.

पिंपरी-चिंचवड “स्मार्ट सारथी ऍप” हा एक दूरदर्शी डिजिटल उपक्रम असून पीसीएमसी स्मार्ट सारथी प्लॅटफॉर्मद्वारे ई-गव्हर्नन्स तसेच नागरिक सहभाग वाढविण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. सध्या सुमारे 2 लाखाहून अधिक नागरिक अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत.

विविध उपक्रमांमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पुढाकार,उपयुक्त माहिती, महापालिकेचा ऑनलाइन कर भरणा, ऑनलाइन विवाह नोंद, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुविधा,नागरवस्ती योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा, आयडीचा वापर करून नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण यंत्रणा, मनपा कार्यालये शोधण्यासाठी “जीपीएस”चा वापर, आपत्कालीन वेळेत संपर्क साधण्यासाठी मदत कार्य, स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पुढाकार, वेबिनारचे आयोजन, मनपाच्या आरोग्य अभियानांची माहिती, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी, विकास प्रकल्पांची माहिती, ब्लॉग लेखन यासह कोविड-19 च्या प्रादुर्भावापासून नागरिकांचे संरक्षण तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या दूरदर्शी लोकोपयोगी डिजिटल उपक्रमाने देशभरात आपली छाप पाडली असून या उपक्रमात सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts

महापालिकेत प्रतिनियुक्ती,यशवंत डांगे, किरणकुमार मोरे यांची नियुक्ती

pcnews24

प्राधिकरणाने मंजुर केलेला भूखंड निगडी व्यापारी संघटनेला मिळावा.निगडी व्यापारी संघटनेच्यावतीने, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन.

pcnews24

पिंपरी चिंचवड: महापालिका प्रशासनाकडून अखेर बेकायदा रुफटॉप हॉटेलवर कारवाईस सुरूवात.

pcnews24

क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक प्रेरणास्थळ –राज्यपाल रमेश बैस,पुनरुत्थान गुरुकुलमधीलशिक्षण दिले कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणारे,क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ उत्साहात.

pcnews24

शहर सौंदर्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार.

pcnews24

निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेमार्फत चाकण येथील शाळेत बोटॅनिकल गार्डनची निर्मिती

pcnews24

Leave a Comment