November 29, 2023
PC News24
राजकारणराज्य

ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय,सलग पाच दिवस शासकीय कामकाज बंद

ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय,सलग पाच दिवस शासकीय कामकाज बंद.

गुरूवारी ( ता. २८ ) अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी आला आहे. यानिमित्त होणारी गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे,आमदार अबू आझमी,आमदार रईस खान,नसीम खान,यांचा समावेश होता.

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलाद निमित्त मिरवणुका काढण्यात येतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे शांततेत पार पाडाव्यात अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली. गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलाद चे उत्सव पर्व सौहार्द – सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

`प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर- प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे वरिष्ठ क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी स्वागत केले आहे. शिक्षक व विद्यार्थी व पालकांना यामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली.

Related posts

महाराष्ट्र:’सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’.

pcnews24

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप!!!

pcnews24

अजित पवारांची आज 10 वाजता बैठक !

pcnews24

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुसेसावळी, सातारा येथे दंगल,एकाचा मृत्यू.

pcnews24

पिंपरी विधानसभेत भाजपाची चिंतन बैठक, मतदारसंघात भाजपच क्रमांक एकचा पक्ष.

pcnews24

बेरोजगारी, दुष्काळ या विषयावर विशेष अधिवेशन का बोलवले नाही – आ. रोहित पवार यांनी उपस्थित केला प्रश्न भाजपात गेलेल्यांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागेल – आ. रोहित पवार

pcnews24

Leave a Comment