नितीन गडकरींची भुमिका साकारणार ‘हा’ अभिनेता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या आयुष्यावर ‘गडकरी’ चित्रपट येणार आहे. याचा काही दिवसांपुर्वी पोस्टर आणि टीझर समोर आला होता. पण यातून गडकरींची भुमिका कोण साकारणार याचे उत्तर मिळाले नव्हते. पण आता या अभिनेत्याचा फोटो आणि नाव जाहीर करण्यात आले. अभिनेता राहुल चोपडा हा गडकरींची भुमिका साकारणार आहे. तर त्यांच्या पत्नी कांचन गडकरींची भुमिका ऐश्वर्या डोरले साकारतील. 27 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होईल.