… म्हणून साजरा होता ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’
‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ आज आहे. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी नागपूरमध्ये आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बौध्द धर्मात प्रवेश केला होता. या दिनी नागपूरला राज्यातील लाखो अनुयायी नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट देत असतात. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस साजरा होतो.