March 1, 2024
PC News24
पिंपरी चिंचवडराजकारणसामाजिक

आगामी निवडणुकांची समीकरणे बदलणार -एकनाथ पवार शिवबंधन बांधणार.

आगामी निवडणुकांची समीकरणे बदलणार -एकनाथ पवार शिवबंधन बांधणार.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या २५ तारखेला मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात भाजपला मोठा धक्का बसणार असून आगामी निवडणुकांचे समीकरण बदलणार असल्याची चिन्हे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होताच दिसू लागली आहे.निवडणुकीचे वारे वाहू लागतच घरवापसीसह इनकमिंग, आउटगोइंग सुरू झाले आहे.

२०१४ साली भाजपकडून भोसरी विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. आमदार म्हणून निवडून आलेले महेश लांडगे यांनी भाजपकडून जागा आबादीत ठेवली आहे. त्यामुळे भोसरीतून विधानसभेला इच्छुक असलेल्या एकनाथ पवारांना तिकीट मिळण्याची आशा मावळली होती. त्यांना ‘स्कोप’ राहिला नाही त्यामुळे त्यांनी गावाकडे मराठवाड्यात लोहा-कंधार मतदारसंघातून लढण्याची मोठी तयारी सुरू केली आहे. तेथे शेकाप खालोखाल शिवसेनेचे प्राबल्य आहे, त्यामुळे विचारधारा एक असलेल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश करायचे ठरवले.

भाजपचे जुने एकनिष्ठ एकनाथ पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याचा मोठा फटका भाजपला शहरात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे कारण २०१४ ला भोसरीतून विधानसभा लढवून ५२ हजार मते घेतली होती.तर 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या प्रभागातून चारही भाजपचे नगरसेवक विजय झाले होते. दोन वर्ष त्यानी महापालिकेत सभागृह नेते म्हणून उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे विधानसभेला भोसरीत त्यांच्या उणिवेचा फटका भाजपला बसणार आहे. महापालिका निवडणुकीत तो जास्त जाणवेल. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

Related posts

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी चा चंदीगड येथे इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज (IUDX) द्वारे सन्मान.

pcnews24

पिंपरी चिंचवड:कचरा विरोधात एकत्र! पुनावळे कचरा डेपो प्रकल्पाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.

pcnews24

निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेमार्फत चाकण येथील शाळेत बोटॅनिकल गार्डनची निर्मिती

pcnews24

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

pcnews24

‘मविआच्या सरकारमध्ये मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या’मोठ विधान

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची अचानक ‘सुखद’ भेट (विडिओ सह )

pcnews24

Leave a Comment