November 29, 2023
PC News24
Otherकलापिंपरी चिंचवडमनोरंजनसामाजिक

‘प्लेस्को दांडिया नाईटस’ मध्ये 10 हजारांपेक्षा अधिक दांडिया प्रेमींनी केली ऑनलाईन नोंदणी -पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन

प्लेस्को दांडिया नाईटस’ मध्ये 10 हजारांपेक्षा अधिक दांडिया प्रेमींनी केली ऑनलाईन नोंदणी* -पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन

पिंपरी : शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह यंदा विविध कार्यक्रमांमुळे वाढणार असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठे दांडिया महोत्सव ‘प्लेस्को दांडिया नाईटस 2.0’चे (PLESCO Dandiya Night’s 2.0) आयोजन

दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पिंपळे सौदागर येथील कै. बाळासाहेब कुंजीर मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी 10 हजार पेक्षा अधिक दांडिया प्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक उमेश काटे यांनी दिली आहे.

पिंपळे सौदागर स्पोर्टस अँँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या (PLESCO) यांच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवात थेट संगीत, दांडिया रास, लाईव्ह बँड, रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यासह सहभागी व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस, सोबतच सांस्कृतिक व सुरक्षित वातावरणाची खात्री अशा अनोख्या संस्कृतीचा संगम याठिकाणी अनुभवायला मिळणार आहे.

दांडिया महोत्सव दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी 7.00 वाजता सुरु होणार असून या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. दांडिया महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश मोफत देण्यात येत आहे.तसेच नवरात्री दुर्गा उत्सवानिमित्त नवनाथ मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 15 ऑक्टोबर – सायं.देवीची प्राणप्रतिष्ठापना

दि.17 ऑक्टोबर – रक्तदान शिबिराचे

दि. 19 ऑक्टोबर – सायं. 8.00 महिलांच्या वतीने “महिला महाआरती”

दि. 22 ऑक्टोबर -सकाळी 9.00 होमवहन व महाप्रसादाचे आयोजन

दि. 24 ऑक्टोबर – विसर्जन सोहळा पार पडणार आहे.

उमेश काटे युथ फाऊंडेशन, नाना काटे सोशल फाऊंडेशन, नवनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून माजी विरोधीपक्षनेता नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये नागरिक आणि दांडियाप्रेमींनी अधिक मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक उमेश काटे यांनी केले आहे.

Related posts

चिंचवड:स्वरसुधा संगीत विद्यालयाचा “समर्पण” हा गुरूपौर्णिमा विशेष सुरेल कार्यक्रम.

pcnews24

पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरती

pcnews24

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

डॉ.हेडगेवारांच्या भूमिकेत झळकणार शरद पोंक्षे.

pcnews24

ब्रेकिंग न्यूज – मी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार शरद पवार (व्हिडिओ सह)

pcnews24

लढा थांबवू नका,उपोषण थांबवा, आता जे सरकार मध्ये आहेत ते चांगले लोक : संभाजी भिडे गुरुजी.

pcnews24

Leave a Comment