March 1, 2024
PC News24
तंत्रज्ञानपिंपरी चिंचवडसामाजिक

बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरता गरजेची,विश्व संवाद केंद्र पुणे व पी.सी.इ.टी इन्फिनिटी रेडिओ तर्फे आयोजन.

बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरता गरजेची,विश्व संवाद केंद्र पुणे व पी.सी.इ.टी इन्फिनिटी रेडिओ तर्फे आयोजन.

पिंपरी चिंचवड (दि.१७)-प्रसार माध्यमांच्या प्रदीर्घ प्रवासात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची व्याप्ती प्रचंड वेगाने वाढत आहे.अशा वेळी प्रत्येक माध्यमांनी आपली विश्वासार्हता जपून समाजप्रबोधनास प्राधान्य द्यावे. कुठल्याही माध्यमाचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर झाल्यास प्रत्येक माध्यम समाजजागृतीसाठी उपयोगी ठरेल, असे मत विश्व संवाद केंद्र, पुणे व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माध्यम संवाद परिषदे’त प्रमुख सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

शनिवार दि.१४ ऑक्टोबर रोजी निगडी प्राधिकरण पी.सी.ई.टीतील बिझनेस स्कूल सभागृहात हा कार्यक्रम झाला.पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमकर्मी व संबंधित अभ्यासकांचा परस्पर परिचय व संवाद व्हावा, या हेतूने ‘बदलते तंत्रज्ञान, माध्यमे आणि समाज’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय तांबट, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक प्रद्योत पेंढारकर तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचे निवेदक विराज सवाई यांनी आपले विचार मांडले.

भारतमाता प्रतिमा पूजन तसेच अनिरुद्ध सराफ व संच यांच्या सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे यांनी तर सारंग पापळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आयोजकांतर्फे मान्यवरांचे स्वागत केले.

यातील प्रमुख वक्ते डॉ.संजय तांबट यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुरुप माध्यमांची वाढलेली व्याप्ती, छपाई यंत्रापासून तर वेब पोर्टल, रिल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतचा प्रवास याबरोबरच भाषाशुद्धी, माध्यम साक्षरता यावर विशेष प्रकाश टाकला.

चित्रपट क्षेत्रातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान याविषयी प्रद्योत पेंढारकर यांनी तर आकाशवाणी जुन्या व आता नव्या स्वरूपातील रेडिओ विषयी विराज सवाई यांनी विवेचन केले.तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये सुरू झालेल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ विषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी आपले अनुभव, माहिती तसेच विविध माध्यमांतील स्थित्यंतरे,समाज माध्यमांचा प्रभाव,आव्हाने याविषयावर मंथन करून सत्य व राष्ट्रीय विचारांना पूरक समाज प्रबोधनात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

या परिसंवादात माध्यमकर्मी उस्फूर्तपणे सहभागी झाले.संवादक डॉ.सुचेत गवई यांनी मान्यवरांना बोलते केले.देवाशिष सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, न्यूज वेब पोर्टलचे संपादक, पत्रकार, व्याख्याते, लेखक, पत्रकारितेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला पी.सी.ई.टी ट्रस्ट व कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई, अजिंक्य काळभोर यांचे सहकार्य लाभले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts

मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आराखडा; औद्योगिक वसाहत आणि ग्रामीण भागात देखील विस्तार.

pcnews24

निगडी येथे दिवसभर वीजपुरवठा बंद..वाचा काय कारणे..

pcnews24

ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन- चांद्रयान लाँचिंग काउंटडाउन देणारा आवाज हरपला.

pcnews24

महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने चुकीचे पत्र सोशल मीडियावर बाहेर.

pcnews24

रावेत पीसीओईआरच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा…’नॅक’चे परीक्षण यशस्वीरीत्या पूर्ण ,ए++ सर्वोच्च श्रेणी प्राप्त

pcnews24

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

pcnews24

Leave a Comment