‘…म्हणून आदित्य ठाकरे दसऱ्यानंतर पळून जातील ‘नितेश राणे यांचे मोठ विधान .
आदित्य ठाकरे हे दसऱ्यानंतर देश सोडून पळून जाणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. अभिनेता सुशांत सिंह आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळत आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे हे परदेशात पळून जाणार असल्याचा दावा राणेंनी केला आहे. दरम्यान, संजय राऊतांना ललित पाटील ड्रग्ज प्रकणावरून अटक होईल, असाही दावा त्यांनी केला आहे.