March 1, 2024
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिकाशाळा/महाविद्यालय/शैक्षणिकसामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा विस्तारासाठी चिखली, तळवडे गावात रस्त्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिराचे आयोजन.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा विस्तारासाठी चिखली, तळवडे गावात रस्त्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिराचे आयोजन.

आज दिनांक २६/१०/२०२३ रोजी चिखली गावठाण मधील म.न.पा. शाळा मुले व मुली व तळवडे गावठाण शाळा मुले व मुली या ठिकाणी खालील विकास आराखड्यातील रस्त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

१)चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२मी/१८मी रुंद डी.पी. रस्ता

२)चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२मी, २४मी व ३०मी रुंद रस्ता

३)चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३०मी रुंद डी.पी. रस्ता

४)चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४मी रुंद रस्ता

५)तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रूंद उर्वरित रस्ता

६) तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता

७) तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.००मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता

सकाळी १०.०० वाजलेपासून ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत जमीन मालक/विकासक जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते. जागा ताब्यात देणेसंदर्भात जमीन मालकांना नगररचना विभागाने तयार केलेला नकाशा दाखवून त्यांचेकडील ७/१२ नुसार जागेची खात्री झालेनंतर नगररचना विभाग व स्थापत्य विभागाकडून प्रपत्र ‘अ’व ‘ब’ जागेवरच देण्यात आले. तसेच TDR/FSIसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती व कार्यपद्धती समजावून सांगणेत आली. महानगरपालिकेने शिबिराचे केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे अनेक जागा मालकांनी सोबत आणलेली कागदपत्रे जमा करून लगोलग आगाऊ ताबा देऊन महानगरपालिकेला सहकार्य केले. काही लोकांनी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेतली असून सदर लोक उद्या दि. २७/१०/२०२३ रोजी शिबीरामध्ये उपस्थित राहून ताबा देणार आहेत. आज झालेल्या शिबीरामध्ये १७२९०.००चौ.मी. जागा ताब्यात आली आहे व उद्या दिवसभर कॅम्प सुरु राहणार आहे.

आज झालेल्या शिबिराचा प्रतिसाद पाहता लवकरच रस्त्यांचे क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात येईल, अशी आशा आहे. सध्या बाजारामध्ये T. D. R.चे वाढलेले भाव व वाढत्या मागणीमुळे जमीनमालकांचा T. D. R. पोटी जागा ताब्यात देणेचा कल वाढला आहे.

वरील रस्त्यांचा भूसंपादन कायद्यान्वये लवकरच निवाडा जाहीर होणार आहे. एकदा निवाडा जाहीर झालेनंतर TDR/FSI चा पर्याय जमीनमालकांना उपलब्ध असणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर नगररचना विभागाकडे जमा करुन T.D. R. / F. S. I.चा लाभ घ्यावा असे महानगरपालिकेकडून आव्हान करणेत येत आहे.

 

Related posts

समाजवादी नेते रवींद्र वैद्य यांचे निधन

pcnews24

शॉर्ट कपड्यावर बंदी आता पुण्यातील मंदिरांमध्ये सुद्धा

pcnews24

महापालिकेच्या वतीने खड्डे दुरूस्तीसाठी विशेष पथकांची नेमणूक

pcnews24

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक.

pcnews24

पिंपरी:जागतिक न्याय दिनानिमित्त पिंपरी न्यायालयात वृक्षारोपण कार्यक्रम

pcnews24

शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा,देशी विदेशी गावठी दारुसाठी वापर

pcnews24

Leave a Comment