‘देशात लवकरच 6 जी युग अवतरणार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम, प्रगती मैदान येथे 7 व्या भारतीय मोबाइल काँग्रेस- 2023 चे उद्घाटन केले. यावेळी देशात 5 जीचा प्रसार वेगाने होत आहे. 5 जी लाँच झाल्यावर वर्षभरात 4 लाख बेसस्टेशन्स निर्माण करण्यात आली असल्याचे ते म्हटले. यावेळी त्यांनी 6 जी चे सुतोवाच केले. देशात लवकरच 6 जी युग अवतरणार आहे. देश 6 जी मध्येही लीडर होण्याची दिशेने वाटचाल करत आहे, असेही पीएम मोदी म्हणाले.