March 1, 2024
PC News24
जिल्हापिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिक

अण्णा भाऊ साठे मैदानावरील अतिक्रमण हटवण्याची सामाजिक कार्यकर्त्याची आयुक्तांकडे मागणी.

अण्णा भाऊ साठे मैदानावरील अतिक्रमण हटवण्याची सामाजिक कार्यकर्त्याची आयुक्तांकडे मागणी.

पिंपरी, दि. २६- निगडी यमुनानगर भागातील आण्णा भाऊ साठे मैदानावर बेकायदेशीर खेळणी व पाळणा उभारण्यात आलेला असून या ठिकाणच्या मैदानावरील खोल्यांचा ताबा घेण्यात आला आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काळभोर यांनी म्हटले आहे की, निगडीतील आण्णा भाऊ साठे मैदानावर खेळणी व पाळणा उभारण्यात आला त्याठिकाणी राडारोडा टाकला असून तंबू ठोकले आहेत. यामुळे दररोज वॉकिंग, जॉगिंग व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेकडे याबाबत तक्रार केली असता हे मैदान महापालिकेच्या. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत नसून ते महापालिकेच्या ताब्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्यावर पालिकेच्या क्रीडाविभागाकडे चौकशी केली असता हे मैदान फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी असलेल्या पाच खोल्या बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन काहींनी पाळणे, खेळणी ठेवली आहेत. याठिकाणी राडारोडा टाकल्याने मैदानाला बकालपणा आला आहे. यासंदर्भात पालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी काळभोर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  मालमत्तेचे सर्वेक्षण आता ‘ड्रोन’द्वारे.

pcnews24

चाकरमान्यांच्या सोयीची सिंहगड एक्सप्रेस वादामुळे चर्चेत.. एक्सप्रेसच्या पाच बोगी ही केल्या कमी.

pcnews24

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग.

pcnews24

आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाला विजेतेपद !!

pcnews24

पिंपरी-चिंचवड शहरासाठी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याबाबत निर्णय..मंत्रिमंडळाची मान्यता

pcnews24

पिंपरी चिंचवड:बोऱ्हाडेवाडी सदनिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण.

pcnews24

Leave a Comment