सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!!
मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक तर 24 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.