रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला!!
आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर 50 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Advertisement
विझियानगरम येथून रायगडच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेने विशाखापट्टणम ते पलासा पॅसेंजर ट्रेनला समोरुन धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते.