March 1, 2024
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

पिंपळे निलख येथील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय- दोघांना अटक,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई.

पिंपळे निलख येथील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय- दोघांना अटक,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला असून त्यांच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली आहे.पिंपळे निलख येथील जे पी फॅमिली स्पा येथे ही कारवाई करण्यात आली.

स्पा चालक मालक जया अशोक जाधव (वय 33, रा. बोपोडी, पुणे), निखिल मोहन नवघन (वय 31, रा. लक्ष्मी नगर, थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला इंगवले नगर, पिंपळे निलख येथे जे पी फॅमिली स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी स्पा सेंटरमध्ये तीन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केल्याचे निदर्शनास आले. त्या तीनही महिलांची सुटका करून स्पा सेंटर चालक मालक आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related posts

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.

pcnews24

26/11 हल्ल्यातील आरोपी भारतात आणणार.

pcnews24

गातेगाव:चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीनेच संपवले.

pcnews24

पदपथ घेणार मोकळा श्वास, जाणून घ्या पालिकेचे नवीन धोरण.

pcnews24

वारजे येथे रस्त्याच्या कडेला सापडली दोन दिवसांची बेबी गर्ल

pcnews24

महानगरपालिका:अस्थायी आस्थापनेवर औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यास मुदतवाढ.

pcnews24

Leave a Comment