मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ’ मध्ये युवा कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अरुंधती पटवर्धन यांच्या वतीने युवा कलाकारांसाठी ‘मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कला महोत्सव 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी (कोथरूड ) येथे होणार आहे.
कला महोत्सवाच्या प्रसंगी ज्येष्ठ नृत्य गुरू डॉ. सुचेता भिडे- चापेकर, सुप्रसिद्ध गायक पुष्कर लेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अरीन तळवलकर( तबला वादन), करण देवगावकर (गायन) हे सहभागी होणार आहेत.
तसेच रसिका गुमास्ते यांच्या शिष्या ओडिसी नृत्य सादर करणार आहेत. नयनतारा पारपिया यांच्या शिष्या कथक सादर करणार आहेत.
सुवर्णा बाग यांच्या शिष्या भरतनाट्यम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.