नामांकित बिझनेस महाविद्यालयातील 40विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास-,पालकवर्ग चिंतेत.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील आय.आय.ई.बी.एम. या नामांकित बिझनेस महाविद्यालयातील अनेक विद्यार्थांना अस्वस्थ वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील आय.आय.ई.बी.एम. या नामांकित बिझनेस महाविद्यालयातील अनेक विद्यार्थांना चक्कर येऊ लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती.एका वृत्त वाहिनीवर या घटनेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. आधी महाविद्यालय परिसरातच उपचार दिल्या जात असलेल्या विद्यार्थ्यांना आता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 40 विद्यार्थ्यांना हा त्रास होत होता. त्यापैकी 12 विद्यार्थ्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासन बोलण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, त्यांनी हा प्रकार घडल्याचे अखेर मान्य केलं.
महाविद्यालयातर्फे राजमाची किल्ल्यावर ट्रेक नेण्यात आला होता. तिथून परत येत असताना हा प्रकार घडल्याचे कॉलेज व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
उपचार घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचा व्यवस्थापनाने दावा केला आहे.उपचारासाठी भरती झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे ब्लड प्रेशर लो असल्याने त्यांना तातडीने उपचार द्यावे लागल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.तरीही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्या एव्हढी गंभीर परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे अद्याप ही समजू न शकल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.