March 1, 2024
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिक

महानगरपालिका:अस्थायी आस्थापनेवर औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यास मुदतवाढ.

अस्थायी आस्थापनेवर औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यास मुदतवाढ.

 

पिंपरी, :- अस्थायी आस्थापनेवर औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत http://apprenticeshipindia.gov.in (NAPS PORTAL) या संकेतस्थळावरील लिंकद्वारे अर्ज भरावेत असे आवाहन महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारांच्या १ वर्ष कालावधी करीता सन २०२३-२०२४ साठी महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत दि.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या विविध विभागात कोपा-पासा, इलेक्ट्रिशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन अँड वातानुकुलन मेकॅनिक, प्लंबर, डी.टी.पी, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्रॉट्समन सिव्हील, सर्व्हेअर व मोटार व्हेईकल मेकॅनिक इत्यादी ११ व्यवसायांच्या एकूण ३०३ जागा आरक्षणनिहाय उपलब्ध आहे. सदर जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या कालावधीला दि. २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरील जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने http://apprenticeshipindia.gov.in (NAPS PORTAL) या संकेतस्थळावरील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरून दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सदर अर्जाचे प्रत्यक्ष कागदपत्रे आय. टी. आय मोरवाडी येथे जमा करावीत, असे विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी सांगितले आहे.

 

Related posts

सध्याच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीत ‘विचार शून्यता’ ही मोठी समस्या – नितीन गडकरी.

pcnews24

अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांत बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवडचा वीजपुरवठा खंडित.. भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून

pcnews24

चिंचवड मध्ये सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून तरुणीला मारहाण करण्याचा प्रयत्न

pcnews24

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन,संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन.

pcnews24

फ्रीझर असलेल्या शवपेटीचे लोकार्पण पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध.

pcnews24

महानगरपालिका :वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका- महापालिकेचा अभिनव उपक्रम..

pcnews24

Leave a Comment