November 29, 2023
PC News24
गुन्हाजिल्हा

पुण्यात घातपात घडवण्याचा होता कट- एनआयएच्या तपासात उघड झाली धक्कादायक माहिती.

पुण्यात घातपात घडवण्याचा होता कट- एनआयएच्या तपासात उघड झाली धक्कादायक माहिती.

पुण्यात साखळी बॉम्ब स्फोट घडवून मोठा घातपात करण्याची योजना आखली जात होती ज्याला सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक एनआयए माहिती तपासात समोर आली आहे.

यापूर्वी कोथरूड परिसरात 19 जुलै रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. परंतु घरझडती घेण्यासाठी जात असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. शाहनवाझने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोधही घेतला होता, असेही तपासात उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)या तपासात महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला अटक केली आहे.त्याच्याकडील तपासात ही माहीती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

पुणे पोलिसांचेही कौतुक –

देशभरात दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना कोथरुड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले. दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात आल्यानंतर पुणे, मुंबईसह देशभरातील महत्वाच्या शहरात घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळला गेला. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा यांचे कौतुक केल्याचे अभिनंदन पत्रही त्यांनी पुणे पोलिसांना दिले आहे.

Related posts

लव जिहादच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा

pcnews24

महादेव जुगार ऍपचा मालक सौरभ चंद्राकर व त्याच्या भागीदारावर ईडी ची कारवाई;बॉलिवूडचे १४ सेलिब्रिटी रडारवर.

pcnews24

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

pcnews24

मोबाईल नंबर ब्लॉक करूनही गुगल पे,फोन पे वर अश्लील मेसेज करीत महिलेचा विनयभंग

pcnews24

बिजली नगर चिंचवड परिसरातील हरितपटा नामशेष होण्याच्या मार्गावर,सखोल चौकशीची मागणी

pcnews24

पुणे:दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणारा बडोदावाला अटकेत.

pcnews24

Leave a Comment