November 29, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

वाकड:संशयास्पद हालचालीवरून पकडलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक -एक वर्षापासून होता फरार.

संशयास्पद हालचालीवरून पकडलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक -एक वर्षापासून होता फरार.

 

वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई श्रीधरनगर चिंचवड येथे करण्यात आली.

अशोक मरीबा तुपेरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(वय 24, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी पायी पेट्रोलिंग करण्याबाबत सर्व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीधरनगर परिसरात पायी पेट्रोलिंग करत असताना चिंचवड पोलिसांना एक तरुण संशयितपणे कारसह थांबलेला दिसला. त्याच्या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले. पोलिसांनी हटकताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळला. त्याच्याबाबत माहिती घेतली असता त्याच्यावर सन 2022 -23 मध्ये अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्री करणे याबाबतचे दोन गुन्हे दाखल असून तो त्या दोन्ही गुन्ह्यात फरार असल्याचे समजले.

तसेच आरोपी अशोक तुपेरे याच्या विरोधात यापूर्वी वाकड पोलीस ठाण्यात सहा आणि चिंचवड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपीला अटक करून त्याच्याकडून 93 हजार रुपये रोख रक्कम आणि कार असा एकूण सहा लाख 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, पोलीस अंमलदार धर्मनाथ तोडकर, सागर आढारी, सचिन सोनपेठे, गोविंद डोके, उमेश मोहिते, रहीम शेख, अमोल माने, पंकज भदाणे, राजेंद्र माळी, सिद्धार्थ खैरे यांनी केली.

Related posts

वायसीएम रुग्णालयावरील ताण होणार कमी-पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत अत्याधुनिक रुग्णालय उभारणार.

pcnews24

खडक:BREAKING- पुणे हादरले……मध्यरात्री गोळीबार

pcnews24

महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांसाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन…

pcnews24

संपत्तीच्या वादावरुन जादूटोणा,अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस,सहा जणांवर गुन्हा दाखल.

pcnews24

चिंचवड:अज्ञाताच्या फोनने ज्येष्ठ नागरिकाचे बँकेतून दिड लाख लंपास

pcnews24

मोबाईल चोरी तपास प्रकरणी पोलिसांची चांगली कामगिरी.

pcnews24

Leave a Comment