महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांसाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन…
पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन केले जाते. यावर्षीही “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी दिवाळी पहाट २०२३” चे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० ते सकाळी १० पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन पहाटे सकाळी ५.३० वाजता होणार असून त्यानंतर सकाळी ६ वाजता चिराग कट्टी यांचे सतार वादन होणार आहे. तर सकाळी ७ वाजता स्मिता देशमुख यांचे शास्त्रीय गायन तसेच ७.३० वाजता विवेक सोनार आणि मानस कुमार यांचे बासरी वादन होणार आहे . या दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता सकाळी ८.३० वाजता शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे.
हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामुल्य असून सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर तसेच युट्यूब चँनेलवर करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रिडा विभागाचे उप आयुक्त मिनिनाथ दंडवते यांनी दिली.