चिंचवडगांव: स्मार्ट सिटीतील तरुण पिढी ‘अति स्मार्ट’ होतेय का? बालगुन्हेगारी वाढीचा प्रत्यक्ष व्हिडीओ.काकडे टाऊनशिप मधील घटना.
https://youtu.be/oKVNfHzrUsg?si=0EwmFbs-EJ-55uee
चिंचवड काकडे टाऊनशिप क्यू आणि आर बिल्डिंग समोर दिनांक ८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास साधारण दहा आणि बारा वर्ष वयाच्या दोन मुलांनी हिरो ऑप्टिमा इलेक्ट्रिक दुचाकी गाडी बनावट चावीने चोरण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा दुचाकी चालू झाली नाही पण काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्यांची ती दुचाकी चालू झाली. दुचाकी चालू झाल्यानंतर ज्यावेळेला पिकप घेतला तर ती गाडी सांभाळता आली नाही व बाजूला पडली.पडल्यावर ती गाडी उचलता येणे शक्य नव्हतं कारण ती गाडी जड होती. त्याचवेळी सोसायटी मधील राहणाऱ्या महिला समोर आल्या आणि त्यांनी त्या मुलांना ती गाडी पडल्यावर विचारणा करण्यास सुरुवात केली,की तुम्ही कोण आहात?हि गाडी कोणाची आहे? ही इथेपर्यंत कशी आणली? त्यावर देखील त्या मुलांनी उडवाउडवीची उत्तर दिली या दरम्यान त्या महिलेला त्या मुलांवरती संशय आला त्यांनी त्यांच्यातल्या एका मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु समोरच्या सोसायटीमधील वॉचमन उपलब्ध नसल्यामुळे ती मुले तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरली.सदर घटनेची माहिती गाडी मालक श्री.नारायण भापकर यांनी माहिती दिली.
या संपूर्ण घटनेनंतर एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विचार करता ही परिस्थिती या मुलांवर का यावी किंवा अशा पद्धतीने या मुलांनी गाड्या चोरण्याच्या दृष्टीने विचार कसा आणि का केला असावा ?
तसेच त्या महिलांनी आपुलकीने चौकशी केली असूनही मुले एवढी निर्ढावलेली,भावनाशून्य कशी असू शकतात? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे समोर येत आहेत.
पिंपरी चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना ही भावी तरुणपिढी सुद्धा ‘अति’स्मार्ट होत आहे का हा प्रश्न नक्कीच उर्वरित राहतो.