November 29, 2023
PC News24
आरोग्यजीवनशैलीपिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिकहवामान

पिंपरी चिंचवड:कचरा विरोधात एकत्र! पुनावळे कचरा डेपो प्रकल्पाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.

पिंपरी चिंचवड:कचरा विरोधात एकत्र! पुनावळे कचरा डेपो प्रकल्पाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.

पुनावळे येथील वनखात्याच्या आरक्षित जागेवर पिंपरी महापालिकेने कचरा डेपोचे नियोजन केले आहे. याला पुनावळे परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे. नागरिकांच्या मागणीला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांच्या नेते कचरा डेपो विरोधात एकत्र आले आहेत.येथे प्रकल्प होऊ देणार नाही,असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या सीमेवर असणाऱ्या पुनावळे परिसरामध्ये वनखात्याच्या जागेवर कचरा डेपोचे आरक्षण आधीपासूनच आहे. त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने कचरा डेपो कचरा विलगीकरण प्रक्रिया केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यास पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष, मनसे, आम आदमी पक्ष अशा विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवलेला आहे. कचरा डेपो होऊ नये, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमत केले आहे.
याबाबत महापालिका आणि शासनाकडे कचरा डेपो होऊ नये,म्हणून पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया विविध पक्षांच्या नेत्यांनी दिली आहे

•खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की पुनावळे परिसरातील कचरा डेपोला नागरिकांनी विरोध दर्शवलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले आहे. गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी कचरा डेपो उभारू नये, याविषयी महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी कचरा डेपो होऊ देणार नाही.

•पुनावळे कचरा डेपोला नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. यासंदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच नागरिकाचे म्हणणे जाणून घेतल्याशिवाय या ठिकाणी महापालिकेने कोणतेही प्रकल्प राबवू नये, अशी आमची भूमिका आहे. चर्चेतून प्रश्न सोडवायला हवा अशी अपेक्षा अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)यांनी व्यक्त केली.

•कचरा डेपोस नागरिकांचा विरोध वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना वास होणार असेल, असे प्रकल्प उभारण्याची गरज काय, मोशीतील कचरा डेपोमधील कचरा प्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे दुसया कचरा ईपोची गरज आहे का, असाही विचार होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष,शंकर जगताप यांनी दिली.

•कचरा डेपो आला तर त्याचा त्रास आजूबाजूच्या ताथवडे, पुनावळे, रावेत, वाल्हेकरवाडी, थेरगाव परिसरातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने कचराडेपो या ठिकाणी उभा करू नये, नागरिकांच्या मागणीस आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पुन्हा येथील कचरा डेपोला विरोध आहे.
– सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

•पुनावळे कचरा डेपोच्या विरोधात विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविलेला आहे.कचरा डेपो
होऊ नये , असे नागरिकांचे म्हणणे असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रकल्प राबवू नये,- कैलास कदम, शहराध्यक्ष, काँग्रेस.

•कचरा डेपोच्या प्रश्नासंदर्भात राजठाकरे यांची नागरिकांनी भेट घेतली. राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा पुनावळेकरांच्या पाठीशी उभा आहे.- सचिन चिखले, शहराध्यक्ष मनसे.

•पूनावळे कचरा डेपोला नागरिकांचा विरोध आहे.नागरिकांचा विरोध असेल, तर प्रकल्प महापालिकेने राबवू नये, या कचरा डेपोमुळे रावेत, ताथवडे, वाकड परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष.राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)

महापालिकेने कचरा डेपोसाठी आरक्षण टाकले. मात्र, त्यावेळी या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. आता प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात लाखो नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे नागरिकांचा विरोध होत आहे. प्रस्तावित कचरा डेपो पासून काही मीटर अंतरावर सोसायट्या झाल्या आहेत. त्यामुळे इथे कचरा डेपो सुरु झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहेत. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत, त्या शैक्षणिक संस्था बंद पडण्याची शक्यता आहे.

Related posts

महापालिकेस 4 स्टार मानांकन..हवामान अनुकूलनासाठी उत्तम कामगिरी.

pcnews24

कुदळवाडी – चिखली परिसरातील बेवारस वाहनांवर व टप-यावंर कारवाई.

pcnews24

मालमत्ता कर जनजागृतीसाठी महानगर पालिकेची अभिनव रील्स स्पर्धा.

pcnews24

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर ‘आपला दवाखाना’

pcnews24

घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक,सर्व अटक आरोपी पिंपरी चिंचवडमधील.

pcnews24

रहाटणी:छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पावित्र्य धोक्यात.

pcnews24

Leave a Comment