मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, अजित पवार यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. आज भंडाऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थीत आहेत. या कार्यक्रमात अजित पवारांचे भाषण सुरु असताना एका व्यक्तीने जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. गोसेखुर्द धरण प्रकल्पग्रस्त ती व्यक्ती असल्याची माहिती आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.