November 29, 2023
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिकासामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरीक व प्रशासनात चर्चा.नागरीकांनच्या सुचनांनवर अंमलबजावणी होणार.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरीक व प्रशासनात चर्चा.नागरीकांनच्या सुचनांनवर अंमलबजावणी होणार.

 

पिंपरी,पिपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. यावेळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या सोमवारच्या ऐवजी तिसऱ्या सोमवारी म्हणजे आज जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ५८ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १३, ७, ४, ५, ४, ५, ८,  आणि १२ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर,विजयकुमार सरनाईक यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे उपस्थित होते.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये मुख्यत्वे शहरातील वायू प्रदूषणावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि शहरातील वाढत्या रहदारीचे योग्य नियोजन करावे अशा सूचनांचा समावेश होता. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, शहर परिसरात वेळोवेळी किटकफवारणी करण्यात यावी या सूचनाही नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

Related posts

नागरिकांनो ‘एक तास स्वच्छतेसाठी’..उपक्रमात सहभागी होण्याचे आयुक्तांचे आवाहन.

pcnews24

हिंजवडी पोलिसां कडून जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश,चांदणी चौक परिसरातील अनेक गुन्हयांची उकल.

pcnews24

पुणे महापालिका आयुक्त – महाराष्ट्र दिनाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

pcnews24

सततच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

pcnews24

सुप्रसिद्ध बेडेकर लोणची-मसाले उद्योग समूहाचे अतुल बेडेकर यांचं ५६ व्या वर्षी निधन.

pcnews24

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे स्मार्ट सारथी अॅप देशात दुसरे तर राज्यात प्रथम-इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड – ‘गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मान

pcnews24

Leave a Comment