‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता’
वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये गेले. यावेळी मोदींनी खेळाडूंना धीर दिला. यानंतर मोहम्मद शमीने ट्वीट करत त्यांचे आभार मानले. यातील फोटोत शमीने रडताना मोदींना मिठी मारल्याचे दिसत आहे. ‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो,’ असे त्याने ट्वीट केले.