पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली !!
जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी चर्चेत आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी त्यांची बदली झाली आहे. आता जालना जिल्हा पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाठीमार प्रकरणानंतर दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.