ड्रग्ज प्रकरणी पोलीसांकडून गोपनीय अहवाल सादर.
पुणे- ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले. आता या प्रकरणी पोलीसांनी अमली पदार्थ तस्कर टोळीबाबत 3 पानी गोपनीय अहवाल कोर्टात सादर केला आहे. आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यावेळी पोलीसांनी हा अहवाल सादर केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे आंतराष्ट्रीय स्तरावर संबंध असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.