वीर दासने जिंकला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड.
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन वीर दासला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला आहे. त्याने बेस्ट कॉमेडी सीरिजमध्ये हा पुरस्कार जिंकला आहे. नेटफ्लिक्सवरील ‘वीर दास लँडिंग’साठी वीरचा गौरव करण्यात आला आहे. यासोबतच ‘डेरी गर्ल्स सीजन 3’ या शोलाही कॉमेडीमध्ये एमी इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याआधी 2021 मध्ये वीर दासला त्याचा कॉमेडी शो ‘टू इंडिया’साठी एमी पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले होते.