February 24, 2024
PC News24
खेळजिल्हापिंपरी चिंचवडसामाजिक

आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाला विजेतेपद !!

आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाला विजेतेपद !!

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या आमदार चषक किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाने 46 सुवर्णपदक 27 रोप्य 32 कास्यपदक 222 गुणांसह विजेतेपद पटकावलं. थेरगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने 40 सुवर्णपदक 13 रोप्य पदक व 12 कास्यपदकासह 158 गुणांसोबत उपविजेतेपद पटकावले.

पुणे येथील स्कूल ऑफ पार्सल आर्ट्स संघाने 115 गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला पनवेल येथील युनायटेड शतकोन असोसिएशनने 79 गुणांसह चतुर्थ क्रमांक पटकावला पुणे येथील विक्टोरिया संघास शिस्तबद्ध चषक देण्यात आला या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुजाताई पलांडे तसेच महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे महाराष्ट्रातील किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी आर्यन्स मार्शल आर्ट चे अध्यक्ष सागर भाऊ रेवाळे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संघटक सुनील भाऊ ढोकळे सामाजिक कार्यकर्त्या नीलम संतोष म्हात्रे वाको महाराष्ट्राचे विकास बडदे आंतरराष्ट्रीय पंच निलेश भोसले अल्टिमेट मार्शल आर्ट चे संस्थापक अविनाश पवार शार्प कूल चे संस्थापक जमीर शिकलगार युनायटेड मार्शल आर्ट चे अभिषेक शॉ अमित शर्मा विक्टोरिया संघाचे संस्थापक अतुल गोडसे प्रतीक कारंडे शिवसेनेचे बोला पाटील महात्मा फुले बुद्ध विहाराचे अध्यक्ष गौतम लहाने CA अरविंद भोसले हे सर्व उपस्थित होते

स्पर्धा प्रमुख म्हणून विकास बडदे यांनी काम पाहिले पंचप्रमुख म्हणून जमीर शिकलगार संदीप माने ऑस्टिन रोड्रिक्स परवेश शेख आदित्य शिरसाट आदित्य अडागळे ओम देशमुख वैष्णवी बरके मानसी पाटील खुशी रेवळे प्रिया माळगे यांनी काम पाहिले

Related posts

पुणे नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

pcnews24

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

pcnews24

चिखली आणि तळवडे परिसरातील रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत : महेश लांडगे

pcnews24

‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’

pcnews24

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी 41 कोटींचा निधी : मुख्यमंत्री

pcnews24

चिंचवड:जनता सहकारी बँक चिंचवडगांव शाखा शांतीबन सोसायटी येथे स्थलांतरीत.

pcnews24

Leave a Comment