March 1, 2024
PC News24
जिल्हाव्यक्तिमत्वसामाजिक

पुणे:‘महिलांसाठी लष्करातील करीयर संधी’ व्याख्यानास प्रतिसाद.

‘महिलांसाठी लष्करातील करीयर संधी’ व्याख्यानास प्रतिसाद

‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’तर्फे (Pune)आयोजित ‘महिलांसाठी भारतीय लष्करातील करीयर संधी’ या विषयावरील व्याख्यानास चांगला प्रतिसाद मिळाला.

आज नू.म.वी. मुलींची प्रशाला येथे दुपारी 12 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थिनींना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा ठिकाणी करियर साठी उपलब्ध संधी, वयोमर्यादा, शिक्षण यासंबंधी कर्नल पराग गुप्ते(निवृत्त ) यांनी मार्गदर्शन केले .फाऊंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले यांनी फाऊंडेशनच्या कार्याचा परिचय करुन दिला.

फाउंडेशनचे (Pune)उपाध्यक्ष सतीश राजहंस,सुजय गोडबोले,विलास कुळकर्णी, मुख्याध्यापिका कल्पना कांबळे, पंडित आदि उपस्थित होते. शाळेच्या क्रीडाप्रमुख संगीता गौड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व शेवटी सगळ्यांचे आभार मानले.

पराग गुप्ते म्हणाले,’ लष्करातील सेवेत येण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी सह अनेक परीक्षा उपलब्ध आहेत. त्यांच्या तयारीसाठी वर्तमानपत्रे वाचली पाहिजे. इंटरनेटवर प्रचलित घडामोडीचा अभ्यास करा. आजबाजुला काय घडतेय त्यावर लक्ष ठेवा. इंग्रजी, गणित विषयांवर भर ठेवा.प्रभावी वक्तृत्व असले पाहिजे’.

‘एनडीएमध्ये 19 जागा मुलींसाठी राखीव आहेत. नेव्हीमध्येही मुलींसाठी राखीव जागा आहेत.शारीरिक क्षमता आणि धाडस असले पाहिजे.मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस, नेव्ही ,वायूसेनेत सेवेची संधी आहे.दहा मिनिटात 3 किलोमिटर पळण्याइतकी किमान क्षमता असली पाहिजे. भारतीय लष्करात अग्निविर म्हणुनही महिला कार्यरत आहेत. मेडिकल सर्व्हिस मध्ये महिला कार्यरत आहेत. एक उत्तम आणि समाधान देणारे करियर म्हणून याकडे पाहिले पाहिजे’,असेही त्यांनी सांगितले.

Related posts

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट’ बनवण्याचा निर्धार!

pcnews24

‘मोचा’ चक्रिवादळ दुपारी धडकणार, मुसळधार पाऊस

pcnews24

निगडी:“रनाथॉन ऑफ होप” मध्ये 4 हजार स्पर्धकांचा सहभाग-

pcnews24

पिंपरी चौकात अशोकस्तंभ उभारण्याची मागणी.

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

पावसाळ्यात वीजसुरक्षे विषयी घ्या विशेष काळजी- महावितरणाचे आवाहन

pcnews24

Leave a Comment