February 24, 2024
PC News24
अपघातजिल्हावाहतूकसामाजिक

पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.

पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.

 

पुणे-लोणावळा लोहमार्गावर खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे पूर्ण केली जाणार आहेत. यामध्ये रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता व नियमितता आणण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंगचे काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २५) पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या १५ लोकल तर रविवारी (दि.२६) ३१ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे खडकी येथील गुड्स शेड आणि मिलिटरी साईडिंग बंद राहण्याची शक्यता आहे. चिंचवड, पिंपरी येथील लोडिंगची कामे देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

 

शनिवारी रद्द केलेल्या लोकल पुणे-लोणावळा लोकल सायंकाळी ६ पासून ते रात्री २३.४५ पर्यंत लोकलच्या १५ फेऱ्या बंद असणार आहेत. गाडी क्रमांक ०१५६५ लोणावळा-शिवाजीनगर लोकल शनिवारी (दि.२५) सायंकाळी ०५.३० वाजता लोणावळा येथून सुटणारी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तसेच रविवारी रद्द केलेल्या लोकल पुणे-लोणावळा लोकल मध्यरात्री १२.१५ पासून ते रात्री ९.४० पर्यंत अशा लोकलच्या ३१ फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

Related posts

८ सप्टेंबर -आजच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम आहे ‘बदलत्या जगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे’

pcnews24

महाराष्ट्र:कोकणवासियांच्या गणेशोत्सव आनंदासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यात वाढ

pcnews24

‘देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक’.

pcnews24

मुख्य बातमी :माथेरानमध्ये टॉय ट्रेन रुळावरून घसरली

pcnews24

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर ‘आपला दवाखाना’

pcnews24

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची गृहमंत्री अमित शहांकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख.

pcnews24

Leave a Comment