February 24, 2024
PC News24
देशराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार, यावर राहुल गांधी व शरद पवार यांच्या प्रतिक्रिया.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे, असे मोदी म्हणाले. तसेच मी जनतेला खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू असे म्हणत त्यांनी भाजपच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो – राहुल गांधी

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी x वर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो विचारधारेची लढाई सुरूच राहील. मी तेलंगणातील जनतेचा खूप आभारी आहे प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या परिश्रम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या विजयावर शरद पवार म्हणाले….

आजच्या निकालामध्ये प्रादेशिक मुद्दे महत्वाचे ठरले आहेत. पण या निकालाचा इंडिया आघाडीवर तसेच 2024 च्या निवडणुकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता येणार नाही. बीआरएसचे राज्याकडे दुर्लक्ष झाले होते. तिथे राहुल गांधींच्या यशस्वी सभेनंतर परिवर्तनाचा अंदाज आला होता. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

Related posts

औरंगजेबाच्या कबरीला भेट देवून प्रकाश आंबेडकरांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या अटकेची मागणी : आनंद दवे.

pcnews24

आदित्य ठाकरे जाणार मथुरा दौऱ्यावर.

pcnews24

राष्ट्रवादी नेते मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा जामीन मंजूर; प्रकृतीच्या कारणास्तव २ महिन्यांसाठी बाहेर.

pcnews24

राम मंदिरासाठी पाठवलेलं गडचिरोलीतील लाकूड 1000 वर्षांपर्यंत टिकणार, ऊन-पाऊस, किडीचा प्रभाव नसेल

Admin

अजित पवार विरुध्द संजय राऊत असा,’सामना’ आता पहायला मिळणार.

pcnews24

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे आघाडीत संभ्रम..विजय वडेट्टीवार

pcnews24

Leave a Comment